Jun 14


ज्येष्ठ साहित्यीक, नाटककार , पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं.त्याना विनम्र श्रद्धांजली.
१९७२ साली आलेले तेंडुलकरांचे " घाशीराम कोतवाल " हे सर्वात वादळी नाटक ठरले. अठराव्या शतकात पुण्यातल्या पेशवाई राजकारणाचा आलेख मांडताना राजकारणातील चिरंतन हिसेंचे सादरीकरण करणा-या या नाटकाचे मराठी आणि इतर भाषांमध्ये आतापर्यंत सहा हजाराहून अधिक प्रयोग झाले आहेत.
पूर्वी मी घाशीराम कोतवाल या नाटक बद्दल खुप ऐकले होते पण जेव्हा मी हे नाटक पाहिले तर माला वाटले हा तर रंगभूमी वरील अत्भुत अविष्कार आहे. न भूतो न भविष्यति असे नाटक पुन्हा घडेल असे वाटत नाही. मुळात हे ऐतिहासिक नाटक नाही. आणि त्यात संगीत असूनही हे संगीतनाटक नाही. एका नव्या धाटणीचं हे नाटक आहे. पण ७२ नंतरही ही धाटणी कुणी चालवली असं फारसं काही दिसत नाही.
संगीत या नाटकाचा मूळ आधार आहे. जर ते काढून घेतलं तर त्यातलं नाट्यच हरपतं , पण हे संगीत नाटक नाही. हा नाटकाचा एक आगळा वेगला प्रकार आहे त्याचे शब्दात वर्णन करने कठीन आहे.हया नाटकात जवळपास ५२ कलाकार आहेत,संगीत नाटकाचा गाभा असल्या मुळे किर्तना पासून लावणी पर्यंत सर्व प्रकार पहायला मिळतात.आणि प्रत्येक वाद्याचा वापर अतिशय जाणीव पूर्वक केला आहे, प्रत्येक वाद्य आपल्याला मन्त्रमुग्घ करून टाकते. आजही घाशीराम देशोदेशी घडतात, घडवले जातात. हे त्रिकालाबाधित सत्य तेंडुलकरांनी ज्या लयीत मांडलय त्याला जबाब नाही.
तेंडुलकरांची अफाट शैली आणि भास्कर चंदावरकर यांचं संगीत यामुळे हे नाटक मैलाचा दगड ठरलं आहे. नाटक आशा प्रकारे ही असू शकतं यावर कदाचित लोकांचा विश्वासही बसणार नाही.
एकूणच एक निराळा नाट्याविष्कार, वेगळं संगीत आणि राजकारण या तिन्ही गोष्टींमुळे नाटक वेगळी उंची गाठतं. पूर्वी मूळ नाटकात म्हणजे ७२ साली मोहन आगाशे यांनी नाना फडणवीसांची भूमीका साकारली होती. पण आताच्या नविन संचात माधव अभ्यंकर यांनी नाना फडणवीसांची भूमीका प्राण ओतून सकरली आहे ही भूमिका इतक्या सुंदर पध्तीने केली आहे की खऱ्या नानानी जर ही भूमिका पाहिली तर ते सुध्दा लाजतिल. आणि ह्या नाटकात २० कलाकारानी ब्रह्मनांची भूमिका केली आहे त्यात सर्वानी छान काम केल आहे पण सुनील गोडबोले यांनी त्यातील एका ब्रह्मनांची भूमिका इतकी अप्रतिम केली आहे त्यांचे चेहऱ्या वरील हावभाव पाहून जुन्या कळातिल पुण्यातिल बेरक्या पद्धतीचे ब्रह्मण कसे असतील ह्याची झलक मिळते. एकुनच नाटक पहिल्या नंतर एक अप्रतिम कलाकृति पहिल्याच आनंद मिळतो.

Tagged with:
preload preload preload